संस्था परचय व ध्येय
उज्ज्वल उद्यासाठी संस्कार, ज्ञान आणि भक्ती यांचे संगोपन.
आमचा प्रवास
श्रद्धा, सेवा आणि शिक्षणाचा प्रवास
श्री विठ्ठल वारकरी शिक्षण संस्थेची सुरुवात १९९८ मध्ये आळंदीतील एका छोट्या धर्मशाळेतून झाली. कौटुंबिक संकट किंवा गरिबीमुळे शिक्षणाची संधी न मिळणाऱ्या वंचित बालकांसाठी ही संस्था आधारघर ठरली.
कै. निवृत्तीराव राजपुरे आणि समाजाच्या सहकार्याने डिसेंबर १९९९ मध्ये आळंदी येथे ८,००० चौरस मीटर जागा घेण्यात आली. देणगी व श्रमदानातून ११ डिसेंबर २००१ रोजी संस्थेची छोटी वास्तू उभी राहिली व ह.भ.प. ज्ञानेश्वरभक्त श्री अर्जुनजी महाराज लाड गुरूजी यांच्या शुभहस्ते तिचे उद्घाटन झाले.
आमची दूरदृष्टी
मूल्याधिष्ठित आणि शिक्षित समाजाची निर्मिती करणे
संतविचारांच्या प्रकाशात प्रत्येक वंचित बालकाला सुसंस्कारीत, स्वावलंबी व सन्माननीय नागरिक म्हणून घडवणे.
आमचे ध्येय
शिक्षण, संस्कार आणि सक्षमीकरण
मुलांमध्ये ज्ञान, शिस्त, आध्यात्मिक मूल्ये आणि जीवनकौशल्ये रुजवून त्यांना जबाबदार नागरिक आणि संवेदनशील माणूस म्हणून घडवणे.
प्रमुख उद्दिष्टे

संस्कारक्षम पिढी निर्माण करणे
संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराजांच्या साहित्याची शिकवण देऊन उत्तम कीर्तनकार व विचारवंत घडवणे.

वारी व दिंडी परंपरा जोपासणे
आषाढी-कार्तिकी वारी व संत सोपानकाका पालखी सोहळ्यात सक्रिय सहभाग.

सामाजिक प्रबोधन
अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, हुंडाबळी, रक्तदान, ग्रामस्वच्छता, प्रौढ शिक्षण व स्त्री-सन्मान यांविषयी जनजागृती.

गोसेवा व समाजकल्याण
गोशाळा, नियमित अन्नछत्र, गरजूंसाठी दवाखाना व निराधार वृद्धांसाठी आश्रम.

संतसाहित्य प्रसार
ज्ञानेश्वरी ओवीचे इंद्रायणी सप्ताह, ज्ञानेश्वरी व तुकाराम गाथा पारायण, ग्रंथालय स्थापना.

मुलींसाठी विशेष शाखा
मुलींसाठी संस्कारवर्ग व स्वतंत्र वारकरी शिक्षण संकुल.
आमच्या प्रवासाचा एक भाग व्हा
सध्या आमची मुले तात्पुरत्या निवाऱ्यात राहत आहेत. त्यांना सुरक्षित आणि आरामदायी वातावरण मिळावे यासाठी आम्ही ३ मजली इमारतीचे बांधकाम सुरू केले आहे.
या पवित्र कार्यात सहभागी व्हा आणि मुलांना हक्काचे, कायमस्वरूपी घर मिळवून देण्यासाठी आपला हातभार लावा.
