svwss.org

प्रवेश व विद्यार्थी दिनचर्या

प्रवेशासाठी पात्रता

उसतोड कामगार, शेतमजूर व रोजंदारीवर काम करणाऱ्या कष्टकऱ्यांची मुले.

अनाथ, निराधार किंवा कौटुंबिक अडचणीत सापडलेली गरजू मुले.

कीर्तन-प्रवचन व शालेय शिक्षणाची प्रामाणिक आवड असणारे विद्यार्थी.

प्रवेशासोबत मिळणाऱ्या सुविधा

१००% मोफत शालेय शिक्षण

मोफत शाळेत प्रवेश, वह्या-पुस्तके, गणवेश व परीक्षा शुल्क.

वारकरी साधना

काकड आरती, हरिपाठ, ज्ञानेश्वरी पारायण, कीर्तन आणि मृदंग/टाळ वादन प्रशिक्षण

सुरक्षित निवास व सकस आहार

घरगुती वातावरणातील पौष्टिक भोजन व नियमित आरोग्य तपासणी.

मूल्यशिक्षण व व्यक्तिमत्त्व विकास

शिस्त, वक्तृत्व व सामाजिक जबाबदारीची जाणीव.

प्रवेश प्रक्रिया

चौकशी

संकेतस्थळावरील अर्ज भरा किंवा संस्थेला प्रत्यक्ष भेट द्या.

पालकांशी संवाद

मुलांची पार्श्वभूमी व कौटुंबिक परिस्थितीची प्राथमिक माहिती.

प्रवेश निश्चिती

नियमानुसार निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा गुरुकुल पद्धतीने समावेश.

दैनंदिन दिनचर्या

वेळ
उपक्रम
पहाटे ४:३०
जागरण, स्नान व शुचिर्भूतता
पहाटे ५:०० – ६:००
काकड आरती व भजन
सकाळी ६:०० – ७:३०
ज्ञानेश्वरी / गाथा पाठांतर
सकाळी ७:३० – ८:००
न्याहारी
सकाळी ८:३० – दुपारी १:३०
शालेय शिक्षण
दुपारी १:३० – ३:००
भोजन व विश्रांती
दुपारी ३:०० – ५:००
पखवाज, तबला, टाळ व गायन प्रशिक्षण
सायं. ५:०० – ६:००
खेळ व व्यायाम
सायं. ६:३० – ७:३०
हरिपाठ व सायंप्रार्थना
रात्री ७:३० – ८:००
भोजन
रात्री ८:०० – ९:३०
शालेय अभ्यास / कीर्तन-प्रवचन अभ्यास
रात्री १०:००
शयन
Scroll to Top