svwss.org

प्रेरणास्थान व व्यवस्थापन

शिक्षण, संस्कार आणि प्रत्येक बालकाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकत्रितपणे कार्य करणारा समर्पित व्यक्तींचा समूह.

आमची ताकद

आमच्या ध्येयामागील समर्पित व्यक्ती

वंचित मुलांना मोफत शिक्षण, निवारा आणि वारकरी संस्कार देण्याच्या समान ध्येयाने प्रेरित अनुभवी मार्गदर्शक, समर्पित विश्वस्त आणि कटिबद्ध कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे कार्य सुरू आहे.

प्रेरणास्थान व व्यवस्थापन

प्रेरणास्थान : ह.भ.प. वै. गोकुळ महाराज धीरसागर

देह जावो अथवा राहो । पांडुरंगी दृढ भावो ॥
निश्चयाचा महामेरू । बहुत जनांसी आधारू ॥

अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत, वयाच्या ८ व्या वर्षापासून परमार्थाची वाट चालणाऱ्या गोकुळ महाराजांनी आपले संपूर्ण आयुष्य अनाथ व उपेक्षित घटकांच्या कल्याणासाठी वाहिले. जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतून आध्यात्मिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी गरीब व गरजू मुलांसाठी आळंदी व पंढरपूर येथे वारकरी शिक्षणाचा पाया रचला. २५ ऑक्टोबर २०१८ रोजी त्यांनी देह ठेवला; मात्र त्यांचे विचार व हे पवित्र कार्य संस्थेच्या माध्यमातून निरंतर सुरू आहे.

नेतृत्व व व्यवस्थापन मंडळ

ह.भ.प. कु. ज्योती वसंत मटकर

अध्यक्ष

ह.भ.प. श्री. भिकू गेनू शिंदे

उपाध्यक्ष

ह.भ.प. श्री. रवींद्र ज्ञानेश्वर येळवंडे

उपाध्यक्ष

ह.भ.प. श्री. राजू बाबू दोरके

सचिव

ह.भ.प. श्री. नवनाथ अरुण गाडे

सहसचिव

ह.भ.प. श्री. रमेश गणपती आंबळे

खजिनदार

संचालक मंडळ व सल्लागार समिती

समाजातील प्रतिष्ठित, समर्पित व निष्ठावंत वारकरी विचारवंतांचे मार्गदर्शन.

Scroll to Top